Kul Ka Kal Hai Beteiyan (कन्या कुळाची शान )

Kul Ka Kal Hai Beteiyan (कन्या कुळाची शान )

Paperback (24 Jun 2020) | Marathi

  • $16.65
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

सांगण्यासाठी आज आपल्या देशाने खूप प्रगती केली असली तरीही देशाच्या खूप मोठ्या भागात मुलींबद्दल त्यांची मानसिकता आजही संकुचित स्वरुपाची आहे. जिथे मुलगा जन्माला आला म्हणून आनंद साजरा केला जातो तिथेच मुलगी जन्माला आली म्हणून चेहरे काळवंडतात. मुलींना ओझे आणि डोकेदुखी आजही समजले जाते.
सांगण्यासाठी तर या देशात मुलींना देवीच्या रुपात पूजन्याची परंपरा आहे, पण तिथेच आज त्यांचा चोरटा व्यापार करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. आजही परंपरा आणि गुलामगिरीच्या विचारामुळे मुली सुरक्षित नाहीत. एक तर जन्माच्या आधीच मुलींना गर्भातच मारून टाकले जाते किंवा मग जन्मानंतर संपूर्ण आयुष्य लिगभेदासह पारंपरिक किंवा सामाजिक शोषणाला बळी पडतात. तसेच त्या हिंसेलाही बळी पडतात. कदाचित या कारणामुळेच स्वातंत्र्य मिळून सात दशके झाल्यानंतरही आपल्याला 'मुलगी वाचवा, मुलीला शिकवा' यासारखी योजना राबवावी लागते.
मुलगा कुलदीपक असेल तर मुलगी त्या दिव्याची ज्योत आहे. ज़्योतीशिवाय दीपक म्हणजे फक्त एक मातीचे भांडे उरते. ज़्योतीमधूनच प्रकाश बाहेर पडत असतो आणि तोच आंधार दूर करीत असतो. म्हणूनच मग आपल्याला जीवनात प्रकाश हवा असेल तर आपल्याला त्या दोघांचाही स्वीकार करावा लागेल. इतिहास साक्षीदार आहे की, प्रत्येक युगात मुलीला कमी समजण्यात आले असले तरीही मुलीच नेहमी कुटुंबाला आणि समाजाला मदत करीत आल्या आहेत. तिने कधी मुलगी, तर कधी आई, बहीण आणि पत्नी होऊन स्वतःला सिद्ध केले आहे. त्या या धरतीवर ओझे नाहीत तर परमात्म्याचे वरदान आहेत, परमेश्वराने निर्माण केलेली सर्वात लाडकी कृती आहे.

Book information

ISBN: 9789352965717
Publisher: Repro India Limited
Imprint: Diamond Pocket Books Pvt Ltd
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 194
Weight: 231g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 10mm